अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी किती व कधी मिळणार?Nuksan Bharpai 

Nuksan Bharpai : राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री भरणे मामा यांनी नुकतीच माहिती दिली आहे की, राज्यातील २९ जिल्ह्यांमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण झाले असून, दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.Nuksan Bharpai 

२९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये जवळपास २९ लाख हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.Nuksan Bharpai 

हेक्टरी मदतीचे दर निश्चित

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली आहे. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाईल. पिकांच्या प्रकारानुसार मदतीचे दर खालीलप्रमाणे आहेत:

हे पण वाचा:
Maharashtra Rain Alert नवरात्रीत पावसाचा जोर वाढणार; आज अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट Maharashtra Rain Alert
  • कोरडवाहू शेती: ₹८,५०० प्रति हेक्टर
  • जिरायती पिके: ₹१३,६०० प्रति हेक्टर
  • बागायती पिके: ₹१७,५०० प्रति हेक्टर

ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

पंचनामे पूर्ण, निधी वितरणाची प्रक्रिया सुरू

कृषी विभाग आणि तलाठी यांच्यामार्फत नुकसान झालेल्या सर्व २९ जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री भरणे मामा यांनी दिली. सध्या हे सर्व प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे आणि पुढे राज्य व केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठवले जात आहेत. ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निधी उपलब्ध होताच तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

गेल्या वर्षी ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात आली होती, मात्र यावर्षी एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार २ हेक्टरच्या मर्यादेतच मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये एक आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.Nuksan Bharpai 

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार Ladki Bahin Yojana

Leave a Comment