Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यापूर्वी तो महाराष्ट्राला जोरदार पावसाने झोडपून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १५ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असून, त्याआधी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे.Maharashtra Rain
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाचा जोर वाढलेला आहे. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
आता बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिसा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.Maharashtra Rain
मुंबई, पुणे आणि ठाण्यासाठी ‘यलो अलर्ट’, तर रायगड-रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’
या बदलत्या हवामानामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केले आहेत.
- मुंबई आणि ठाणे: मुंबईत रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
- पुणे: पुण्यातही पुढील चार दिवस हलक्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. शुक्रवारी पुण्यामध्ये बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.
- रायगड आणि रत्नागिरी: या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, येथे अतिवृष्टीची शक्यता आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होतो?
मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधील वातावरणावर अवलंबून असतो. राजस्थानच्या वातावरणाच्या खालच्या थरात जास्त दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास आणि सलग पाच दिवस हवामान कोरडे राहिल्यास मान्सून परतल्याचे जाहीर केले जाते. यंदा नेहमीपेक्षा दोन दिवस आधी म्हणजे १७ सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
या अंदाजानुसार, पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.Maharashtra Rain