जास्त पावसामुळे कापूस पिक सुकतंय; शेतकरी बांधवांनो हे उपाय करा!Kpaus Mar Rog 

Kpaus Mar Rog  : गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीत पाणी साचले आहे. याचा मोठा फटका कापूस पिकाला बसला असून, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचून कापसाच्या झाडांवर ‘आकस्मिक मर’ किंवा ‘बुरशीजन्य मर’ या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे कापसाची झाडे कोमेजून वाळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

या समस्येवर वेळीच उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या (नांदेड) कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पंडागळे यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत.Kpaus Mar Rog 

Kpaus Mar Rog  ‘मर’ रोगाची लक्षणे

  • पाणी साचलेल्या ठिकाणी कापसाची पाने मलूल होऊन झाड मान टाकल्यासारखे दिसते.
  • झाडाचे मूळ अन्नद्रव्ये शोषून घेत नाही, त्यामुळे झाड कोमेजून जाते.
  • पाऊस थांबल्यानंतर ३६ ते ४८ तासांत ही लक्षणे दिसू लागतात.
  • कालांतराने झाड पूर्णपणे वाळून जाते आणि पानगळ होते.

‘मर’ रोगावर तातडीने करा हे उपाय

१. पाण्याचा निचरा करा: शेतात पाणी साचले असल्यास, चर खोदून ते पाणी त्वरित शेताबाहेर काढा. शेतामध्ये वाफसा (जमीन कोरडी) होणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
csmssny 3 महिन्यात शेतकरी कर्जमाफी : कोर्टाचा सरकारला आदेश ! csmssny order on court

२. आळवणी (Drenching) करा: तुम्ही खालीलपैकी कोणताही एक उपाय करू शकता. हे द्रावण झाडांवर फवारणी न करता, फक्त त्याच्या बुंध्याशी टाकायचे आहे.

  • पहिला उपाय: कॉपर ऑक्सीक्लोराइड (250 ग्रॅम) + युरिया (2 किलो) + पांढरा पोटॅश (००:००:५०) (1 किलो) हे सर्व 100 लिटर पाण्यात मिसळा. हे द्रावण प्रत्येक बाधित झाडाच्या बुंध्याशी 100 मिली या प्रमाणात टाका.
  • दुसरा उपाय: पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) हे विद्राव्य खत (500 ग्रॅम) + कोबाल्ट क्लोराईड (1 ग्रॅम) हे 100 लिटर पाण्यात मिसळा. हे द्रावण प्रत्येक झाडाला 100 मिली या प्रमाणात आळवणी करा.

३. खोडाजवळील माती दाबा: पाण्यामुळे जर कापसाची झाडे झुकली असतील, तर त्यांना मातीचा आधार देऊन सरळ करा. खोडाजवळील माती दोन्ही पायांनी व्यवस्थित दाबून झाड घट्ट बसवा, जेणेकरून मुळांना आधार मिळेल.

४. जमिनीतील हवा खेळती ठेवा: जमीन वाफशावर आल्यानंतर हलकी आंतरमशागत करा. यामुळे मुळांना हवा मिळेल आणि झाडे लवकर पूर्ववत होतील.

हे पण वाचा:
gold price increse update सोन्याचे दर 1,43,000 प्रती 10 ग्रॅम !. gold price increse update

हे सर्व उपाय कापूस पिकावर ‘मर’ रोगाची लक्षणे दिसताच २४ ते ४८ तासांच्या आत करणे महत्त्वाचे आहे. उपचारास जितका उशीर होईल, तितका त्याचा परिणाम कमी होईल आणि नुकसान होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे, शेतकऱ्यांनी त्वरीत लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.Kpaus Mar Rog 

Leave a Comment