Ration Card: 12 जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना गहू-तांदळासोबत आता मिळणार ज्वारी

Ration Card : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. यापुढे रेशन दुकानातून मिळणाऱ्या गहू आणि तांदळासोबतच आता पौष्टिक ज्वारीही उपलब्ध होणार आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे, शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांना रुचकर चपातीसोबतच पौष्टिक भाकरीची चवही घेता येणार आहे.

या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठी सातारा जिल्ह्याला ३७,२६० क्विंटल ज्वारीचा पुरवठा होणार आहे. ही ज्वारी जळगाव जिल्ह्यातील नांदुरा येथील गोदामातून उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Ration Card

असा असेल ज्वारीचा पुरवठा

शासनाच्या या नवीन निर्णयानुसार, रेशनकार्ड धारकांना मिळणाऱ्या धान्याच्या वाटपामध्ये बदल करण्यात आला आहे:

हे पण वाचा:
Post Office Scheme पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना करेल तुमचे पैसे दुप्पट! सुरक्षित गुंतवणुकीसह मिळेल मोठा फायदा Post Office Scheme
  • अंत्योदय गट: या गटातील कार्डधारकांना प्रति कार्ड ८ किलो गहू, २० किलो तांदूळ आणि ७ किलो ज्वारी मिळणार आहे.
  • प्राधान्य गट: या गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती १ किलो गहू, ३ किलो तांदूळ आणि १ किलो ज्वारी असे वाटप केले जाईल.

याआधी अंत्योदय गटाला १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ मिळत होता, तर प्राधान्य गटाला प्रति माणसी २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळत होता. नवीन बदलामुळे गहू आणि तांदळाच्या प्रमाणात थोडे बदल झाले असले तरी, ज्वारीसारखे पौष्टिक धान्य रेशनवर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.Ration Card

ज्वारीचे वाढलेले महत्त्व

काही वर्षांपूर्वी ज्वारीला गरिबांचे धान्य मानले जायचे आणि ती गव्हापेक्षा स्वस्त होती. मात्र, ज्वारीच्या आरोग्यविषयक फायद्यांवर संशोधन झाल्यानंतर ज्वारीची मागणी वाढली. त्यामुळे तिचे दरही वाढले. आता हीच पौष्टिक ज्वारी थेट स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध होणार असल्यामुळे, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात पौष्टिक आहार घेणे शक्य होणार आहे.

राज्यातील नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहमदनगर, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली अशा एकूण १२ जिल्ह्यांसाठी ज्वारीचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, अशी आशा आहे.Ration Card

हे पण वाचा:
Krushi Samruddhi Scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना जाहीर; ड्रोन, शेततळे, BBF यंत्रांसाठी कोट्यवधींचे अनुदान Krushi Samruddhi Scheme

Leave a Comment