या कारणामुळे केंद्र सरकारने थांबवले पीएम किसानचे मानधन ;काय आहे कारण? जाणून घ्या PM Kisan New Update

PM Kisan New Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा सातवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील सुमारे ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० ऑनलाइन वितरित करण्यात आले आहेत.PM Kisan New Update

पीएम किसान योजनेत मोठे बदल

केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यापूर्वी ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती होती, त्याला ₹६,००० चा वार्षिक हप्ता मिळत होता. मात्र, आता एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांच्या नावावर शेती असली तरी, फक्त एकालाच मानधनाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या नवीन नियमानुसार, आता पतीचा हप्ता थांबवण्यात आला असून, केवळ पत्नीलाच मानधन दिले जात आहे. या निर्णयामुळे राज्यातील ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यांना पीएम किसानचा २० वा हप्ता मिळालेला नाही.PM Kisan New Update

कुटुंबाच्या व्याख्येनुसार निर्णय

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी ‘कुटुंब’ या शब्दाची व्याख्या स्पष्ट केली आहे. यामध्ये पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील मुलांचा समावेश होतो. काही कुटुंबांमध्ये पती-पत्नी या दोघांनीही योजनेसाठी नोंदणी केली होती आणि त्यांच्या नावावर जमीन होती. अशा परिस्थितीत, आता पतीचा हप्ता थांबवण्यात आला आहे, तर पत्नीचा हप्ता सुरू ठेवण्यात आला आहे. यामुळे, ज्या ६० हजार शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत, त्यांच्या पत्नींना मात्र लाभ मिळाला आहे.

हे पण वाचा:
Post Office Scheme पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना करेल तुमचे पैसे दुप्पट! सुरक्षित गुंतवणुकीसह मिळेल मोठा फायदा Post Office Scheme

पीएम किसानचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आला होता. त्याचा लाभ राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना मिळाला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २०१९ पूर्वी शेतकऱ्याच्या नावावर जमीन खरेदी असणे आवश्यक आहे, असाही एक महत्त्वाचा नियम आहे.PM Kisan New Update

Leave a Comment