Pm kisan : देशातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक संकटात मोठा आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा २१ वा हप्ता आज शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या आपत्तीग्रस्त राज्यांतील शेतकऱ्यांसाठी आगाऊ स्वरूपात वितरित करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथून या २१ व्या हप्त्याचे वितरण केले.Pm kisan
२७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५४० कोटी जमा
या निर्णयानुसार, पूरग्रस्त भागातील २७ लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ₹५४० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जमा करण्यात आली आहे. विशेषतः पंजाबमध्ये महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा २१ वा हप्ता लवकर जारी केला आहे.
कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या संकटकाळात आपत्तीग्रस्त राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.Pm kisan
पूरग्रस्तांना इतरही मदत
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासोबतच केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी इतरही मदतीची घोषणा केली आहे:
- पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण अंतर्गत ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना घरे बांधून दिली जातील.
- मनरेगा (MGNREGA) योजनेअंतर्गत पूरग्रस्तांना १५० दिवसांचा रोजगार देखील उपलब्ध करून दिला जाईल.
यावेळी बोलताना कृषिमंत्र्यांनी पूरग्रस्त राज्यांतील लोकांना आश्वस्त केले की, “केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल.”
‘पीएम किसान’चा लाभ सीमेवरील शेतकऱ्यांसाठीही
याशिवाय, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. देशाच्या सीमेवरील गावांमध्ये राहणाऱ्या आणि ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क नाही, अशा शेतकऱ्यांनादेखील लवकरच पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.Pm kisan