nlm scheme: शेळी पालन योजना अर्ज करण्यासाठी किती खर्च येतो.

nlm scheme शेतकरी व शेळीपालक मित्रांनो, अनेक ठिकाणी “एनएलएम योजना म्हणजे लाखो रुपयांचा खर्च” असा गैरसमज पसरलेला आहे. कोणी ₹25,000, कोणी 2% म्हणजेच ₹2 लाख पर्यंत मागणी करतंय. पण खरी माहिती काय आहे:

एनएलएम (NLM) योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व त्याचा अंदाजे खर्च

कागदपत्र / प्रक्रिया अंदाजे खर्च

  • प्रोजेक्ट रिपोर्ट (CA मार्फत) 3,000 – 5,000 20 लाख ते 1 कोटी प्रकल्पासाठी आवश्यक
  • प्रशिक्षण व अनुभव प्रमाणपत्र 2,000 ऑनलाइन + प्रत्यक्ष प्रशिक्षण उपलब्ध
  • उद्योग आधार प्रमाणपत्र (Udyam Aadhar) 200 स्वतः काढल्यास मोफत
  • सातबारा, भाडेकरार, वारस नोंद, संमतीपत्र 100 – 300 तालुक्याच्या ऑफिसमधून मिळते
  • बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मोफत बँकेतून मिळवता येते
  • डॉक्युमेंट स्कॅन/अपलोडिंग व ट्रॅकिंग सहाय्य 100 – 200 नेट कॅफे किंवा ओळखीचा व्यक्ती करू शकतो

एकूण खर्च किती येतो?

  • 20 लाखांच्या योजनेसाठी: ₹5,000 – ₹7,000 (कमाल ₹8,000)
  • 1 कोटीच्या योजनेसाठी: ₹8,000 – ₹10,000 (कमाल ₹12,000)
    यापेक्षा जास्त देणे म्हणजे फसवणूक

फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करू?

1. दोन टक्के कमिशन / दलाली देऊ नका.
2. प्रत्येक खर्चाची पावती मागा.
3. प्रशिक्षण अधिकृत संस्थेकडूनच घ्या.
4. सरकारी वेबसाईटवर स्वतः अर्ज करा किंवा ओळखीच्या विश्वासार्ह व्यक्तीची मदत घ्या.
5. पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, युट्यूबवरील मार्गदर्शक यांचा सल्ला घ्या.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार Ladki Bahin Yojana

nlm scheme अंतिम सल्ला:

nlm scheme एनएलएम योजना ही पूर्णपणे पारदर्शक आहे. अर्ज प्रक्रिया अगदी सोपी असून स्वतः केली तर ₹5,000 – ₹10,000 च्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतात. कोणीही 25 हजार, 50 हजार किंवा 1-2 लाख मागत असेल तर तो तुमचं अज्ञान विकतोय.

Leave a Comment