Maharashtra Flood Relief : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतीत पाणी साचले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत, तर अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विरोधकांकडून सातबारा कोरा करण्याची मागणी होत असतानाच, आता राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना दिली जाणाऱ्या मदतीचे संभाव्य स्वरूप समोर आले आहे.
अतितातडीची मदत लवकरात लवकर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसल्यास ‘उणे बजेट’ (Negative Budget) मधून ही मदत दिली जाण्याची शक्यता आहे.Maharashtra Flood Relief
संभाव्य मदतीचे स्वरूप (प्रति व्यक्ती/नुकसान)
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्त नागरिकांना खालीलप्रमाणे आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे:Maharashtra Flood Relief
| नुकसानीचा प्रकार | संभाव्य मदत (रुपये) |
| व्यक्तीचा मृत्यू | ₹४,००,००० |
| दुग्धप्राण्यांचा मृत्यू | ₹३७,५०० |
| मेहनतीचे/ओढ काम करणाऱ्या जनावरांचा मृत्यू | ₹३२,००० |
| झोपडीची पडझड | ₹८,००० |
| पक्क्या घरांची पडझड | ₹१२,००० |
सरकारचे धोरण आणि केंद्राकडे मदतीची मागणी
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार मदतीचे निकष बाजूला ठेवून मदत करेल, असे संकेत दिले आहेत.
राज्यातील नुकसानीची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे, आता राज्य सरकार केंद्र सरकारला पत्र लिहून मोठ्या आर्थिक मदतीची मागणी करणार आहे.
राज्य सरकार लवकरच मदतीचे वाटप सुरू करण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य सरकार नेमकी किती आणि कशी मदत करणार, तसेच केंद्र सरकारकडून राज्याला किती आर्थिक मदत मिळते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्याला तात्काळ दिलासा मिळावा, हीच सध्याची सर्वात मोठी अपेक्षा आहे.Maharashtra Flood Relief