दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात मोठी वाढ!DA Hike

DA Hike : केंद्र सरकार लवकरच सरकारी नोकरदार आणि निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) वाढ होण्याची शक्यता असून, यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.DA Hike

महागाई भत्त्यात ३% वाढ अपेक्षित

महागाई भत्ता (DA) हा दरवर्षी दोनदा वाढवला जातो. सध्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. सूत्रांनुसार, जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी सरकार महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करू शकते. ही वाढ झाल्यास महागाई भत्त्याचा एकूण दर ५८ टक्के होईल.

या वाढीची घोषणा दसरा आणि दिवाळीचा सण लक्षात घेऊन ऑक्टोबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. ही वाढ झाल्यावर देशातील सुमारे १.२ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे. महागाईमुळे वाढणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी ही वाढ केली जाते, त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे.DA Hike

हे पण वाचा:
Post Office Scheme पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना करेल तुमचे पैसे दुप्पट! सुरक्षित गुंतवणुकीसह मिळेल मोठा फायदा Post Office Scheme

आठव्या वेतन आयोगाचीही शक्यता

महागाई भत्त्यातील वाढीसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) देखील सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते.

एकूणच, दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्त्याची वाढ आणि वेतन आयोगाबद्दलच्या सकारात्मक बातम्या, यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही ‘डबल गिफ्ट’ ठरेल असे म्हटले जात आहे.DA Hike

हे पण वाचा:
Krushi Samruddhi Scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना जाहीर; ड्रोन, शेततळे, BBF यंत्रांसाठी कोट्यवधींचे अनुदान Krushi Samruddhi Scheme

Leave a Comment