बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्रा यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट!Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या बदलामुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहील. या कालावधीत काही भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह (ताशी ३० ते ४० किमी) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विजा चमकण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.Maharashtra Rain Alert

हे पण वाचा:
Post Office Scheme पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना करेल तुमचे पैसे दुप्पट! सुरक्षित गुंतवणुकीसह मिळेल मोठा फायदा Post Office Scheme

राज्यात ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट Maharashtra Rain Alert

पुढील काही तासांमध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस)

असलेले विभाग आणि जिल्हे:

  • मराठवाडा: जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.
  • कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा: संपूर्ण कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • विदर्भ: बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.Maharashtra Rain Alert

यलो अलर्ट (जोरदार पाऊस)

असलेले विभाग:

हे पण वाचा:
Krushi Samruddhi Scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना जाहीर; ड्रोन, शेततळे, BBF यंत्रांसाठी कोट्यवधींचे अनुदान Krushi Samruddhi Scheme
  • विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागांत जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

शेतकरी आणि नागरिकांना आवाहन आहे की, हवामानाचा अंदाज घेऊन शेतीची कामे करावीत आणि विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.Maharashtra Rain Alert

Leave a Comment