अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत राज्यातील ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार..!pik nuksan bharpa

pik nuksan bharpa : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकार लवकरच आर्थिक मदत देणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे १९५ तालुक्यांमधील ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकूण १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) शेती बाधित झाली आहे.pik nuksan bharpa

हे पण वाचा:
gas cylender gst 22 सप्टेंबरनंतर LPG सिलेंडर स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन GST दर. gas cylender gst

pik nuksan bharpa या पिकांना बसला फटका

या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.pik nuksan bharpa

सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे

  • नांदेड: ७,२८,०४९ हेक्टर
  • यवतमाळ: ३,१८,८६० हेक्टर
  • वाशीम: २,०३,०९८ हेक्टर
  • अकोला: १,७७,४६६ हेक्टर
  • धाराशिव: १,५७,६१० हेक्टर
  • बुलढाणा: ८९,७८२ हेक्टर
  • सोलापूर: ४७,२६६ हेक्टर

नुकसानग्रस्त जिल्हे नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांतील शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरतील.

हे पण वाचा:
rain update मान्सूनचा परतीचा प्रवास या जिल्ह्यांना अलर्ट rain update

काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित क्षेत्रांमधील पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.

ही मदत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीतून सावरण्यास नक्कीच मदत करेल. सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.pik nuksan bharpa

हे पण वाचा:
csmssny 3 महिन्यात शेतकरी कर्जमाफी : कोर्टाचा सरकारला आदेश ! csmssny order on court

Leave a Comment