तुमच्या घरातून एखाद्याला घरकुल मिळालंय? मग तुम्हाला मिळेल का?

घरकुल योजनेबाबत अनेक जण विचारतात की, “जर माझ्या घरातील कोणाला घरकुल मिळालं असेल तर मला देखील मिळू शकतं का?” सरळ उत्तर आहे – नाही, जर तुम्ही त्याच मेंबर आयडीमध्ये असाल, तर तुम्हाला पुन्हा घरकुल मिळणार नाही. पण तुम्ही त्या यादीत आहात की नाही, हे तुम्ही घरी बसून सहज तपासू शकता.

घरकुल स्टेट्स साठी या 2 गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात:

1. घरकुल क्रमांक (Registration Number)
2. मेंबर आयडी (Member ID)

मोबाईलवरून घरी बसून कसं कराल तपासणी?

Step 1: वेबसाइट उघडा https://pmayg.nic.in
Step 2: पहिल्या स्टेपमध्ये ‘IAY/PMAYG Beneficiary’ या पर्यायावर क्लिक करा
इथे घरकुल क्रमांक टाका कॅप्चा भरून सबमिट करा त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल
Step 3: खाली दिलेला Member ID कॉपी करा
Step 4: परत ‘Stakeholders’ मध्ये जा ‘AwasPlus Family Member Details’ वर क्लिक करा आपलं राज्य सिलेक्ट करा आता कॉपी केलेला Member ID टाका कॅप्चा भरा आणि ‘Get Family Member Details’ वर क्लिक करा

हे पण वाचा:
gas cylender gst 22 सप्टेंबरनंतर LPG सिलेंडर स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन GST दर. gas cylender gst

महत्वाचं: तुमचं नाव Member ID लिस्टमध्ये आहे का?

असल्यास: तुम्हाला घरकुल मिळणार नाही नसल्यास: तुम्हाला घरकुल मिळण्याची संधी आहे.

सरकारी नियम काय सांगतो?

एका मेंबर आयडीमध्ये फक्त एकाच व्यक्तीला घरकुल मंजूर केलं जातं उरलेले सदस्य “त्या घराचे हिस्सेदार” मानले जातात त्यामुळे तुमचं नाव दुसऱ्या यादीत नसेल तरच घरकुलची पात्रता असते. घरकुल मिळणार की नाही हे आता कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त 2 गोष्टी – घरकुल नंबर आणि Member ID असतील, तर तुम्ही मोबाईलवरूनच हे सर्व ऑनलाईन तपासू शकता.

हे पण वाचा:
rain update मान्सूनचा परतीचा प्रवास या जिल्ह्यांना अलर्ट rain update

Leave a Comment